500+ Happy Birthday Wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (2023)

Posted on January 12, 2022 at 3:24 pm

जर तुम्ही Happy Birthday Wishes in Marathi मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात, या पोस्टमध्ये आमच्याकडे ५०+ पेक्षा जास्त मित्र आहेत, आई, वडील, मैत्रीण, बॉयफ्रेंड, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, पत्नी, पती, शिक्षक, काका, वहिनी आणि बरेच काही. तसेच, वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा, स्टेटस, एसएमएस, कविता, मराठीतील कोट्स.

If you are looking for Happy Birthday Wishes in Marathi then you are landed in right place, in this post we have more than 500+ मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा for Friends, Mother, Father, Girlfriend, Boyfriend, Brother, Sister, Son, Daughter, WifeHusband, Teachers, KaKa, Vahini and more. Also, Funny Birthday WishesStatus, SMS, Poems, Quotes in Marathi.

Happy Birthday Wishes in Marathi

Happy Birthday Wishes in Marathi

Contents

1. Happy Birthday Wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
2. Vadhdivsachya Shivmay Shubhechha in Marathi | मराठीत वधदिवसच्य शिवमय शुभेच्छा
3. Happy Birthday Wishes for Friend in Marathi | मराठीमध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
4. Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi | मराठीत मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
5. Happy Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड साठी मराठी मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
6. Happy Birthday Wishes for Mother in Marathi | मराठीत आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
7. Happy Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
8. Happy Birthday Wishes for Brother in Marathi | मराठीत भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
9. Happy Birthday Wishes for Sister in Marathi | मराठीत बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
10. Happy Birthday Wishes for Vahini in Marathi | वहिनीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
11. Happy Birthday Wishes for Kaka in Marathi | मराठीत काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ
12. Happy Birthday Wishes for Son in Marathi | मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
13. Happy Birthday Wishes for Daughter in Marathi | मुलीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
14. Happy Birthday Wishes for Husband in Marathi | मराठीत पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
15. Happy Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
16. Happy Birthday Wishes for Teacher in Marathi | मराठीतील शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
17. Funny Birthday Wishes in Marathi | मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
18. Happy Birthday Status in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
19. Happy Birthday SMS in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस
20. Happy Birthday Poem in Marathi | मराठीत कविता वाढदिवसाच्या शुभेच्छा
21. Happy Birthday Quotes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा
22. Final Words

Happy Birthday Wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो.. बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो.. आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी..
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी..
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी..
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी..
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे..
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे..
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा..
वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!

संकल्प असावेत नवे तुझेमिळाव्यात त्यांना नव्या दिशाप्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझेह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…

Vadhdivsachya Shivmay Shubhechha in Marathi | मराठीत वधदिवसच्य शिवमय शुभेच्छा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात..
बाकी सारं नश्वर आहे.
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा.

नवे क्षितीज नवी पाहट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
आठवड्याचे ७ दिवस..
आणि माझा आवडता दिवस..
तो म्हणजे तुमचा वाढदिवस..
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना..
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

Happy Birthday Wishes for Friend in Marathi | मराठीमध्ये मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

दोस्ती कभी बड़ी
नहीं होती
निभाने वाले हमेशा
बड़े होते हैं
..पाटील
आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा..

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा..

काही माणसं स्वभावाने कशी का असेनातमनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
..तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..

काळजाचा ठोका म्हना किंवा शरिरातील प्राण
असाहा आपला मित्र आहेे
भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
काळजाच्या या तुकड्याला
..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday mitra

Happy Birthday Wishes for Girlfriend in Marathi | मराठीत मैत्रिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि
शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील
तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Dear

तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर gift आहेस,
आणि माझ्यासाठी तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
हॅप्पी बर्थडे माय लव

असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss
केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री
तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू

नातं आपल्या प्रेमाचं
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावंं
हॅपी बर्थडे माय लव

मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील,
माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने
माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्यात येऊन माझ आयुष्य खूप सुंद
केल्याबद्दल, मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव

साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
हॅपी बर्थडे माय लव

तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू

परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला एक सुंदर गिफ्ट द्यावं म्हटलं,
मग नंतर मनात विचार आला जी स्वत:च इतकी
सुंदर आहे तिला काय सुंदर गिफ्ट देऊ…
हॅप्पी बर्थडे पिल्लू

Happy Birthday Wishes for Boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड साठी मराठी मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

धमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.

तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.

तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस.
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा !

तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling

मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !

तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

तू ती एकटी व्यक्ती आहेस ज्याच्यासोबत मला
माझे उर्वरित आयुष्य व्यतीत करायचे आहे !
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्वीटहार्ट !

वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा !

प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते
माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझा स्पर्श होताच जाणीव होते मला माझ्या असण्याची
तू नजरेसमोरून दूर होताच ओढ लागते मला तुला पुन्हा भेटण्याची
Happy Birthday My Love

तुझ्या Birthday ची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते
आणि तुला हे दाखवून द्यावेसे वाटते कि
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे
Happy Birthday Babu I Love You

किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु. हॅप्पी बर्थडे

तुला कोणी पाहिलंतर जीव माझा जळतो
जगापासून कुठे लपवू मग हा विचार मला पडतो
Happy Birthday Darling

आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यभरासाठी साथ दयायची कि नाही हा निर्णय तुझा आहे, पण मरेपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे.
Happy Birthday

Happy Birthday Wishes for Mother in Marathi | मराठीत आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला
जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”

घर सुटत पण आठवण कधीच सुटत नाही,
जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही
सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात,
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!
Aai, Happy Birthday!

माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे की
नशिबात लिहिलेले पाहू मला तर माझ्या
आईच्या हसऱ्या चेहऱयाकडे पाहूनच समजते की माझे भविष्य उज्वल आहे.

माझा शाळेतील अभ्यास असो किंवा आयुष्यातील अडचणी
असो मला सर्वात आधी मदत करणारी माझी आईच आहे.

चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते.
हॅप्पी बर्थडे डिअर मदर.

माझ्या यशाचे सर्वात मोठे रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे आई.

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या…
१. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा”
२. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई”
Happy Birthday आई..!

बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल.
पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई!

जगात असे एकच न्यायालय आहे
जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..!
जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..!
Happy Birthday आई..!

मुंबईत घाई
शिडीच्या साई
फुलात जाई
आणि गल्लो गल्लीत भाई
पण या जगात सगळ्यात भारी
आपली आई
आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत … ती म्हणजे माझी आई
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
तुझे कष्ट अपार आहेत
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
किती गाऊ आई तुझी थोरवी
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
हेच आता देवाकडे मागणे आहे
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
Happy Birthday Aai

आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
आई तुला उदंड आयुष्याच्या
अनंत शुभेच्छा..
Happy Birthday Mummy

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर
आई म्हणजे घराचा आधार,
आई विना ते गजबजलेले घरच असते निराधार
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

आई माझी सर्वप्रथम गुरू
तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू
Happy Birthday Maa

जेव्हा मला मिठी हवी असेल तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले आणि मला उडण्यासाठी पंख दिले.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहेत
आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देवो
..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब..

ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला माझी आई
Happy Birthday Aai

जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे.
Happy Birthday Aaisaheb

जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हात तुझा मायेचा असुदे मस्तकावरी,
झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नेहमी अशीच माझ्यासोबत राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..!
आई तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..! “आई”

माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही
तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
Happy Birthday Mom

आत्मा आणि ईश्वर यांचा संगम म्हणझे आई..
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा..

Happy Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांना मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला
तर “आई गं” हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो
तेव्हा “बाप रे!” हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते
पण मोठमोठी वादळं पेलताना बापच आठवतो
Happy Birthday BABA

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
नेहमीच दिलात आश्वासक आधार
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
जणू बनलात आमचे श्वास
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला
सुख समाधान मिळो तुम्हाला
तुम्हाला दीर्घायु लाभू दे
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ
आम्हा मिळू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
Happy Birthday Papa

आपले चिमुकले हात धरून जे आपल्याला
चालायला शिकवतात ते बाबा असतात
आपण काही चांगले केल्यावर जे अभिमानाने
सगळ्याना सांगतात ते बाबा असतात
माझ्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी
जे कष्ट घेतात ते बाबा असतात
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना
जे आपल्याला चुकताना सावरतात ते बाबा असतात
आपल्या लेकराच्या सुखासाठी
जे आपला देह ही अर्पण करतात ते बाबा असतात
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा बाबा

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आपले दुःख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
म्हणजे वडील
..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देता
मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत बाबा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..

वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
हैप्पी बर्थडे बाबा

प्रिय बाबा, आज जग मला तुमच्या नावाने ओळखतं
हे खरं आहे.. पण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,
मी इतकं कर्तृत्व करेन,
की एक दिवस, हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
तुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,
तुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,
या पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…
खरंच बाबा, केवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात
हे यश आहे! आणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,
तुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन!
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!

मी कधी बोलत नाही सांगत नाही
पण
बाबा, तुम्ही या जगातले बेस्ट बाबा आहात..

बाबांचा मला कळलेला अर्थ,
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

Happy Birthday Wishes for Brother in Marathi | मराठीत भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस.
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र,
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

माझ्याकडे आपल्यासारखा भाऊ आहे
त्यामुळे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण आपल्या आयुष्यातील
सर्वात सुंदर वेळ एकत्र घालवला आहे.
तुझ्यामुळे माझे बालपण खूप छान होते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस
तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस.
तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

माझ्या
लाडक्या
भावाला
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छाा

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी
आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
“Happy Birthday Bhava”

नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ
देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे
भाग्य फार थोड्या लोकांना मिळते.
तूच माझा खरा मित्र आहेस आणि नेहमी असाच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे.
तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

हॅपी बर्थडे भावा..
आज तुझा दिवस..
सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझं
कर्तव्य पार पाडलं आहे.
हॅपी बर्थडे भावा

आज तुझा वाढदिवस आहे
परंतु आजचा दिवस
माझ्यासाठीही खूप खास आहे
कारण आजच्या दिवशी
काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र
आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला

भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी एक रोल मॉडेल आहेस.
कारण तू खूप प्रेमळ, काळजी घेणारा, नेहमी संरक्षण करणारा आहेस
आणि नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस.
तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.

मला तुझ्यासारखा भाव दिल्याबद्दल
मी देवाचे आभार मानते.
माझी अशी इच्छा आहे की
मी पुन्हा एकदा बालपणात परत जाईन
आणि तुझ्याबरोबर खूप खूप खेळेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Sister in Marathi | मराठीत बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

रडवते पण, हसवते पण,
उठवते पण, झोपवते पण,
आई नसून पण,
काळजी करते जशी माझी आई
जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा ताई!

मुलांमधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

एका वर्षात असतात ३६५ दिवस
अन एक महिनात असतात ३० दिवस
या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस
हैप्पी बर्थडे Sister!

मी खूप भाग्यवान आहे
मला बहीण मिळाली
माझ्या मनातील भावना समजणारी
मला एक सोबती मिळाली
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
Happy Birthday Didi

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी
Happy Birthday Tai

प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे.

आईच्या मायेला जोड नाही
ताईच्या प्रेमाला तोड नाही
मायेची सावली आहेस तू
घराची शान आहेस तू
तुझे खळखळतं हास्य म्हणजे आईबाबांचे सुख आहे
तू अशीच हसत सुखात राहावी
हीच माझी इच्छा आहे
लाडक्या बहिणीला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Birthday Taisaheb

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते
आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.

पोरांमधी sweet गर्ल,
क्रश, Attitude गर्ल,
अशा वेग-वेगळ्या नावांनी
Famous असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा!

आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणती व्यक्ती असेल
तर ती तुमची बहीण असते
Love You Sister
Happy Birthday DiDi

मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे
.हॅपी बर्थडे दी..

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

थांबा थांबा थांबा
आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या
वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का…
हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली!

मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy Birthday Tai

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना

Happy Birthday Wishes for Vahini in Marathi | वहिनीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नात नसल जरी रक्ताच
पण त्याहूनही घट्ट करूया
आयुष्यात भेटलेल्या
आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया…
हॅप्पी बर्थडे वहिनी

तुमच्यासोबत चा प्रत्येक क्षण खास आहे
वहिनी तुम्ही माझ्या हृदयाच्या खूप पास आहेत.
Happy Birthday my sister In law

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वहिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार वहिनी दिली..!
माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

गोरी गोरीपान फुलासारखी छान
माझी वहिनी सौंदर्याची खाण
वहिनी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले आज आला आहे एक खास दिवस माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते Happy Birthday Vahini

सुंदर आणि कोमल फुलपाखराप्रमाणे
संपूर्ण घरात प्रेमाचे रंग पसरवणाऱ्या
वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वहिनी असावी तुमच्यासारखी आनंद वाढवणारी,
भाग्यवान आहे मी जो तुमच्यासारखी वहिनी मिळाली.
तुम्ही नेहमी अश्याच हसत आणि आनंदी राहा
हीच प्रार्थना आज मी देवापाशी केली.
Happy birthday vahini saheb

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
खरोखर भाग्यवान आहोत आम्ही जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली.
परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली.
हॅपी बर्थडे वहिनी.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली आहे
नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली आहे
सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी.
काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी…!

होळीचा रंग वहिनी !!
मैत्रीची संग वहिनी !!
प्रेमाचे बोल वहिनी
पाकळ्यांचे फूल वहिनी
हॅप्पी बर्थडे वहिनी..!

परीसारख्या आहात तुम्ही
तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
हीच प्रार्थना मी आज करतो मनी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

भरपूर भरपूर स्वप्ने होती तिच्या उरात,
पण स्वसुखाची आशा न धरता ती आली आमच्या घरात.
ती येण्या आधी सर्व आम्ही बांधलेलो रक्ताच्या नात्याने,
पण ती नातं जोडून आली वेद मंत्राच्या वाटेने.
हॅप्पी बर्थडे वहिनी

जशी बागेत दिसतात फुले छान
तशीच दिसते दादा आणि तुमची जोडी छान..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी..!

सोन्यासारख्या माझ्या वहिनीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

Happy Birthday Wishes for Kaka in Marathi | मराठीत काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
Happy Birthday my sweet uncle..!

तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी
तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.
आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.
हॅपी बर्थडे काका..

माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात
मा झ्या बाजूला उभ्या असणाऱ्या
माझ्या काकांना व काकांच्या रूपात
मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आनंदी क्षणांनी भरलेले आपले
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

काका तुम्ही माझे मोठे वडील
असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.
तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला
सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती
आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत
प्रिय आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

काका तुमच्या आवडत्या मुलाकडून
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत काका.
पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!

नेहमी माझी काळजी घेणारे व
आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,
मला चांगले वाईट समजावणारे
माझे आवडते काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy Birthday Wishes for Son in Marathi | मराठीत मुलासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.

वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.

आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.

नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.

नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.

Happy Birthday Wishes for Daughter in Marathi | मुलीला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
गाल फुगवून बसायची
वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
घर भर नाचायची
आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
Surprise Gift
मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस,
मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस.
Happy birthday My Princess.

तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं,
तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल.
Wish you many many happy returns of the day.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy Birthday My Daughter.

तुझा वाढदिवस म्हणजे एक सुंदर फूल आहे,
जे माझ्या जीवनरूपी बागेत प्रत्येक वर्षी सुगंध देत आहे,
तुझ माझ्या आयुष्यात असणं म्हणजे जसा सूर्य आकाशात आहे,
जो जीवनभर माझ्या आयुष्यात प्रकाश देत आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

किती गुणी आणि समंजस आहेस तू…
आज हे लिहित असतांना तुझ्या
जन्मापासून ते आजपर्यंतचे
काही क्षण प्रसंग आठवले
Happy Birthday My Dear Daughter

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday My Daughter.

आजचा दिवस खास आहे,
आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली,
चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली,
आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
Happy Birthday to My Princess

या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे
जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले
आणि माझं जीवनच बहरून गेले
ती दूसरी कुणी नसून ती माझी लाडकी
राजकन्या आहे
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

गुलाबाच्या ओठी आली घेऊन
ती गोड चैतन्याची गाणी
जस पहाटेच पडलेलं स्वप्न
जशी परीची कहाणी
माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Happy Birthday

जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुझी आई होऊन झाले धन्य…
इतकी समजूतदार आहेस की,
जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी..
लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा जन्मदिवस आज
Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha

आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Happy Birthday Wishes for Husband in Marathi | मराठीत पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात
आणि शेवट तुमच्या नावाने होते,
माझ्या आयुष्यातील तुमचे स्थान
नेहमीच विशेष राहील.
Happy Birthday Husband

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

प्रिय पतीदेवा, आपले वर्णन करण्यासाठी काही
खास शब्दः अद्भुत, आश्चर्यकारक, अद्वितीय,
अतुलनीय, Handsome – देखणा, मजबूत, अविश्वसनीय.
आपली साथ कायम असो.
तुम्हाला वाढदिवसाच्या प्रिय शुभेच्छा!

तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
तेव्हा माझं मन फुललं
देवाची आभारी आहे ज्याने
तुमची माझी भेट घडवली
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर
सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे
, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
पती देवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

तुम्ही माझ्या जीवनात आलेली
सर्वात चांगली गोष्ट आहात!
मला इतके हास्य, इतके आनंदी
आणि खूप-खूप प्रेम देऊन
तुम्ही माझं जीवन फुलवलं.
आपल्या वाढदिवशी मला तुम्हाला
धन्यवाद द्यायला आवडेल
आणि मी आठवण करून देऊ इच्छित आहे
कि, मी तुमच्यावर खूप-खूप प्रेम करते.
वाढदिवसाच्या प्रेमभरे शुभेच्छा!

जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear
Enjoy your day my Dear
हॅपी बर्थडे Hubby..

आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!

आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आयुष्य खूप मौल्यवान आहे आणि
तुमचा प्रत्येक दिवस मौल्यवान असावा.
मी प्रत्येक क्षणी तुमच्या जवळ आहे आणि
मी आणखी एक मौल्यवान वर्ष
तुमच्याबरोबर घालवल्याबद्दल कृतज्ञ आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वात दयाळू व माझ्या विचारवंत
नवऱ्याला हार्दिक शुभेच्छा.

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Happy Birthday Wishes for Wife in Marathi | बायकोला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तू आहेस म्हणून मी आहे,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..
तूच माझ्या जीवनाची सुरुवात,
आणि तूच शेवट आहेस…
Happy Birthday Dear
I Love You So Much!

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,
मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ
स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे…
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday My Beautiful Wife

प्राणाहून प्रिय बायको,
तुला वाढदिवसा निमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
Happy Birthday Bayko
prakat dinachya hardik shubhechha marathi

जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं,
पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.
Happy Birthday बायको

मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू
माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..
तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस
बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
Love You Bayko

तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो नाही असं नाही
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
बस्स! आणखी काही नको.
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको

तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday Wishes for Teacher in Marathi | मराठीतील शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि
ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार..
हॅप्पी बर्थडे सर

गुरु असतो महान
जो देतो सर्वांना ज्ञान
वाढदिवशी माझ्या गुरूंच्या
मी करितो त्यांना प्रणाम
गुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

अक्षर अक्षर आम्हास शिकवता
शब्द शब्दांचा अर्थ सांगता
कधी प्रेमाने तर कधी रागाने
जीवन जगणे आम्हास शिकवता
हॅप्पी बर्थडे सर

अज्ञानाच्या अंधकारातून विद्यार्थ्याला ज्ञानाच्या
प्रकशात आणणाऱ्या आमच्या शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

जीवनाच्या प्रत्येक समस्येत
मार्ग दाखवता तुम्ही
जेव्हा काय करावे काहीही समजत नाही
तेव्हा आठवण येतात तुम्ही
तुमच्यासारख्या गुरूंना मिळवून
खरोखर धन्य झालो आहोत आम्ही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर

मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल माझ्या शिक्षकांचे धन्यवाद..
Happy birthday sir

तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशीर्वादापेक्षा कमी नाही
माझ जग बदलण्यासाठी खूप खूप धन्यवाद.
Happy birthday sir.

सामान्य शिक्षक सांगतात,
चांगले शिक्षक स्पष्ट करतात,
वरिष्ठ शिक्षक प्रात्यक्षिक करतात आणि
तुमच्या सारखे महान शिक्षक प्रेरित करतात
तुम्हाला वाढदिवसा निमित्ताने अनंत शुभेच्छा..!

गुरुची आपल्या उपकारांचे
कसकाय फेडू मी मोल,
लाख किमती धन जरी
परंतु गुरु माझे आहेत अनमोल..!
सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Funny Birthday Wishes in Marathi | मराठीत मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात प्रत्येकाला चांगला मित्र मिळत नाही..
मात्र तू भाग्यवान आहेस की,
तुला माझ्यासारखा मित्र मिळाला
Happy Birthday Dear Best Friend

आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थडे ला
सगळं गाव हजर,
आपल्या भावास वाढदिवसाच्या
ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..

नाव :- XYZ
वय:- 30 वर्षाचा घोडा
काम :- नुसते बोंबलत हिंडणे,
भावाची थोड़ी माहिती – भावा बद्दल बोलण्यासारखे काहीच नाही,
मुलींमधे सतत राहणारे फिरणारे मजा करणारे,
साक्षात मुलींच्या गळ्यातील तायीत,
१०० वेळा स्वताला आरशात पाहणारे,
नाईलाजाने जिम करुन स्वताःला फिट ठेवणारे
अभ्यासात भोपळा असणारे,
पोरगी दिसली की क्या माल है म्हणनारे,
पण, सर्वांचा आदर करणारे, आई वडिलांना मानणारे,
कष्टाळू होतकरू, बायकोच्या नातेवाईकांचा आदर करणारे..
अशा आमच्या या वाया जाऊन सुधारलेल्या मित्राला,
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..!

सर्वात दिलदार
आणि मित्रांवर पैसे उडवनारा,
Party बिना बोले देणारा
Cool Mind असलेल्या भावाला
Happy Wala Birthday..

तालुक्याची आण बाण शान,
शेकडो मित्रांच्या दिलाचे प्राण,
लोकांच्या हृदयावर नव्हे तर
मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या,
भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..

अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या लाडक्या भाऊंना
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा

तू तुझा वाढदिवस विसरू शकतो,
मात्र मी कधीच विसरू शकत नाही..
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाला
याची आठवण करून द्यायला मला नेहमी आवडते..
Happy Birthday Dear Friend

Happy Birthday Status in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday SMS in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा एसएमएस

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना..
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
बार बार ये दिन आए, बार बार ये दिल गाये, तुम जियो हजारो साल,ये है मेरी आरज़ू..
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.

Happy Birthday Poem in Marathi | मराठीत कविता वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

Happy Birthday Quotes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा

“केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.”
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

“मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.”
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

“जिवाभावाच्या मित्राला
उदंड आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा”
Happiest Birthday

“आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको”
Happy Birthday

“एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..”
हॅपी बर्थडे!

“उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला
बाबांकडून”
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Final Words

Hope you liked this huge collection of 500+ Happy Birthday Wishes in Marathi do share with your friends, family and loved ones, please share your thoughts about मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा in the comments section below!

 

Recent Posts

    Categories

Love Status
Recent Post
100+ Society Quotes
100+ Health Quotes